A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पहा टाकले पुसुनी डोळे

पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका
रणांगणी जा सुखे राजसा परतुन पाहू नका !

झडे दुंदुभी, झडे चौघडा
रणरंगाचा हर्ष केवढा !
एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका !

शकुनगाठ पदरास बांधुनी
निरोप देते तुम्हा हासुनी
आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका !

या देशाची पवित्र माती
इथे वीरवर जन्मा येती
तोच वारसा तुम्ही पोचवा येणार्‍या शतका !
दुंदुभि - नगारा, एक वाद्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.