A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पहाट झाली उठा उठा

एकामागून एक उजळती, आकाशाच्या रंगछटा
पहाट झाली उठा उठा

नारी चालल्या लगबग पायी
कुणी खांद्यावर कावड वाही
जलभरणाची एकच घाई, झरे राहिले पैलतटा

पशुपक्षीगण झाले जागे
गाव हळूहळू उजळू लागे
मंदिरातला सेवक सांगे, भावभक्तीची फुले लुटा