पाहतेच वाट तुझी
पाहतेच वाट तुझी जागवून रात रात
दाटतात आसवेच या उदास लोचनात
दाट दाट किर्र तिमीर वाढवितो खिन्नताच
शेजेवर एकटीस स्मृति हळव्या टोचताच
मन वेडे होइ दंग भलभलत्या कल्पनात
शब्द मला देउनिया का विलंब लावलास
कमलिनि ही आतुर रे भ्रमराला भेटण्यास
विरहाचे दंश सख्या, अंग अंग पोळतात
दु:ख असे दाहक जे एकटीच भोगतसे
लागलेच मजला रे विरहाने आज पिसे
नच रंगे सूरांविण प्रणयाचे गोड गीत
दाटतात आसवेच या उदास लोचनात
दाट दाट किर्र तिमीर वाढवितो खिन्नताच
शेजेवर एकटीस स्मृति हळव्या टोचताच
मन वेडे होइ दंग भलभलत्या कल्पनात
शब्द मला देउनिया का विलंब लावलास
कमलिनि ही आतुर रे भ्रमराला भेटण्यास
विरहाचे दंश सख्या, अंग अंग पोळतात
दु:ख असे दाहक जे एकटीच भोगतसे
लागलेच मजला रे विरहाने आज पिसे
नच रंगे सूरांविण प्रणयाचे गोड गीत
गीत | - | म. पां. भावे |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत |
कमळिणी | - | कमलिनी. कमळण. कमळाची वेल. |
पिसे | - | वेड. |
शेज | - | अंथरूण. |
Print option will come back soon