पाहुणा म्हणुनी आला
पाहुणा म्हणुनी आला, जरा घरात थारा दिला
दांडगाई करुनी ग बाई चार दिसात घरधनी झाला
भोळीस भासला भोळा
साधाच आणि मनमोकळा
परि अंगात नाना कळा
डोळ्यास लावता डोळा, मज पुरता कावा कळला
पचताच पहिली ही खोडी
करी खुशाल लाडीगोडी
हृदयीचे कुलुपही तोडी
भर दिवसा करी घरफोडी, चोरटा घरामधी घुसला
दांडगाई करुनी ग बाई चार दिसात घरधनी झाला
भोळीस भासला भोळा
साधाच आणि मनमोकळा
परि अंगात नाना कळा
डोळ्यास लावता डोळा, मज पुरता कावा कळला
पचताच पहिली ही खोडी
करी खुशाल लाडीगोडी
हृदयीचे कुलुपही तोडी
भर दिवसा करी घरफोडी, चोरटा घरामधी घुसला
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | आनंदघन |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | राम राम पाव्हणं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कळा | - | युक्ती, कौशल्य. |
कावा | - | कारस्थान / लबाडी, ढोंग. |