पैलतिरी रानामाजी
पैलतिरी रानामाजी, नको नको येऊ नको रे
प्रीत आहे माझी भोळी, साद तिला घालू नको रे
बालपण दूर गेले निघुनी, श्रावणाचे स्वप्न आले
बांधावर कोणी आले शिवारा, पाऊल ते कानी आले
ओलावल्या गीताला तू सूर ओला देऊ नको रे
भारावले डोळे गेले मिटुनी, भावनांचे सूर झाले
शोध घेती आज भाव किनारा, ओठांतही शब्द आले
गंधवेड्या शब्दांतुनी या अर्थ वेडा काढू नको रे

| गीत | - | अशोक जी. परांजपे |
| संगीत | - | अशोक पत्की |
| स्वर | - | सुमन कल्याणपूर |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| शिवार | - | शेत. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.

सुमन कल्याणपूर