पांखरा गाऊं नको
पांखरा गाऊं नको
प्रेमवेड्या वंचिकेचा शाप तू घेऊ नको
एकटी मी सांजवेळी
तिमिर दाटे भोवताली
अंतराला आठवाची वेदना देऊ नको
विफल झाली प्रीतीपूजा
दूर गेला नाथ माझा
मीलनी आभासवे का लोचना दावू नको
प्रीतीचे ते स्वप्न जागे
ओढती ते गूढ धागे
काळजाला रेशमाचा काच तू लावू नको
प्रेमवेड्या वंचिकेचा शाप तू घेऊ नको
एकटी मी सांजवेळी
तिमिर दाटे भोवताली
अंतराला आठवाची वेदना देऊ नको
विफल झाली प्रीतीपूजा
दूर गेला नाथ माझा
मीलनी आभासवे का लोचना दावू नको
प्रीतीचे ते स्वप्न जागे
ओढती ते गूढ धागे
काळजाला रेशमाचा काच तू लावू नको
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | लक्ष्मण रेषा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
वंचित | - | फसविलेला. |