पक्ष्यांचे लक्ष थवे
पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे
तेजोमय विश्वाचे ओठावर गीत हवे
वार्यावर गंधभार भरलेले ओचे
झाडांतुन लदबदले बहर कांचनाचे
घन वाजतगाजत ये- थेंब अमृताचे
सोन्याची अंबारी, सोन्याचे इंद्रधनू
धरतीवर मृदुल पाय उतरले कुणाचे
तेजोमय विश्वाचे ओठावर गीत हवे
पक्ष्यांचे लक्ष थवे
तेजोमय विश्वाचे ओठावर गीत हवे
वार्यावर गंधभार भरलेले ओचे
झाडांतुन लदबदले बहर कांचनाचे
घन वाजतगाजत ये- थेंब अमृताचे
सोन्याची अंबारी, सोन्याचे इंद्रधनू
धरतीवर मृदुल पाय उतरले कुणाचे
तेजोमय विश्वाचे ओठावर गीत हवे
पक्ष्यांचे लक्ष थवे
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | संजय हांडे |
स्वर | - | पद्मजा फेणाणी-जोगळेकर |
गीत प्रकार | - | कविता |
अंबारी | - | हत्तीच्या पाठीवरचे शोभिवंत आसन. |
ओचा | - | पदर. |
कांचन | - | सोने. |