A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता

पांडुरंग त्राता : पांडुरंग दाता
अंतींचा नियंता पांडुरंग

दयेचा सागर : मायेचें आगर
आनंदाचें घर पांडुरंग

भक्तीचा ओलावा : दृष्टीचा दिष्टावा
श्रद्धेचा विसावा पांडुरंग

तप्तांचें चंदन : दीप्तांचें इंधन
प्रकाशवर्धन पांडुरंग

अंगसंगें त्याच्या झालो मी निःसंग
देहींचा साष्टांग पांडुरंग
Random song suggestion