पंख हवे मज पोलादाचे
पंख हवे मज पोलादाचे
शूर लढाऊ जटायुचे
सीतेपरी जो हरण करोनी
असह्य अबला नेईल कोणी
काळझेप ती तिथे घालुनी
शील रक्षण्या स्त्रीजातीचे
निज जननीला मुक्त कराया
गरुड मागता अमृत देवा
तुच्छे हासता इंद्र तेधवा
वज्र तोडण्या त्या इंद्राचे
गर्भपिलांना सागर गिळता
क्रोधे उठली पक्षिण टिटवी
जळा पेटवी, सागर आटवी
अगस्तीच्या सामर्थ्याचे
शूर लढाऊ जटायुचे
सीतेपरी जो हरण करोनी
असह्य अबला नेईल कोणी
काळझेप ती तिथे घालुनी
शील रक्षण्या स्त्रीजातीचे
निज जननीला मुक्त कराया
गरुड मागता अमृत देवा
तुच्छे हासता इंद्र तेधवा
वज्र तोडण्या त्या इंद्राचे
गर्भपिलांना सागर गिळता
क्रोधे उठली पक्षिण टिटवी
जळा पेटवी, सागर आटवी
अगस्तीच्या सामर्थ्याचे
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | माणसाला पंख असतात |
राग | - | हिंडोल |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
अगस्ती | - | महाभारतात अगस्ती ऋषींनी केलेल्या समुद्रप्राशनाची कथा आहे. देव-दानव युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेला कालकेय हा दानव समुद्राच्या तळाशी जावून लपला. तेव्हा अगस्तींनी अख्खा समुद्र पिऊन कालकेयाला ठार मारले आणि देवांवरील संकट दूर केले. |
जटायु | - | पक्षिराज. रावण सीतेस पळवून नेत असता हा त्याच्याशी लढला. यानेच रामाला रावणाने सीता लंकेत नेली असे सांगितले. |
तेधवा | - | तेव्हा. |