A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पाण्या तुझा रंग कसा

पाण्या तुझा रंग कसा?
ज्याला जसा हवा तसा !

चांदराती चंद्रापरी
काळ्या राती कृष्णापरी
या रे कुणी तीरी बसा
ज्याचा त्याला दिसेल ठसा !

पाण्या तुझा गंध कसा?
मेळ ज्यासी घडे तसा !

फेका तरी हार ताजा
मोगर्‍याचा वास माझा
चंदनाने चंदनसा
गंधकाने गंधकसा !

पाण्या तुझा स्वाद कसा?
ज्याला जसा हवा तसा !

साखरेने गोड करा
द्राक्षरसे मधुर जरा
अमृताने अमृतसा
विषासवे विष जसा !

येती किती जाती किती
त्याची मला नाही भीती
वाहतसे नित्य असा
कुणी हसा कुणी रुसा !

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  आशा भोसले