पाण्याहून सांजवेळी जात होते
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
अडवून वाट माझी उभा राहे हरी
मनात मी बावरले
कशीबशी सावरले
अचानक तोच हाय कोसळल्या सरी
आभाळात ओले रंग
चिंब चिंब माझे अंग
काय उपयोग आता सावरून तरी?
पडे अनोळखी भूल
फुलले मी जसे फूल
बासरीचे सूर माझ्या झाले प्राणभरी
काही बोलले मी नाही
वितळल्या दिशा दाही
चांदण्याचा राजहंस धरिला मी उरी
अडवून वाट माझी उभा राहे हरी
मनात मी बावरले
कशीबशी सावरले
अचानक तोच हाय कोसळल्या सरी
आभाळात ओले रंग
चिंब चिंब माझे अंग
काय उपयोग आता सावरून तरी?
पडे अनोळखी भूल
फुलले मी जसे फूल
बासरीचे सूर माझ्या झाले प्राणभरी
काही बोलले मी नाही
वितळल्या दिशा दाही
चांदण्याचा राजहंस धरिला मी उरी
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | उषा मंगेशकर |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, ऋतू बरवा, भावगीत |