A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
परतीच्या या वाटेवरती

परतीच्या या वाटेवरती, असेच काही घडते
निघता निघता वाटच वळते, पावलांत घुटमळते

डोळ्यांमधला ढगाआडचा पाऊस येतो
प्रतिबिंबांचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो
दूर दूर पण पुन्हा नव्याने वीज अशीच चमकते

कधी हसरा दुखरा क्षण यावा, निघून जावा
कधी अचानक जावे जखमांच्या गावा
लपवून आसू, हसरे गाणे मनामनात उमलते

हा रंगांचा श्यामल हिरवा उजेड आला
आणि दिलेला हात कुणाचा उजाड झाला
काटा कोमल होतो आणिक हृदयी फूलच सलते

फुलातला हा गंध कुणाला दिसला नाही
कसा धरावा मुठीत तारा लपला नाही
आभासातून भास फिरावा तसे तसेच उमगते
गीत - अशोक बागवे
संगीत - मिलिंद इंगळे
स्वर- मिलिंद इंगळे
चित्रपट - गोजिरी
गीत प्रकार - चित्रगीत
सल - टोचणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.