पाषाणातुनी वेड्या का तू
पाषाणातुनी वेड्या का तू बघसी रे श्रीराम
अंतरी आहे आत्माराम
त्या देहाच्या देव्हार्यातुन, ज्योती उजळत नयनदळातून
दोन करांची माला वाहून कर भक्ती निष्काम
निर्मळ गंगा करुन मनाची, कावड न्यावी पावित्र्याची
मन कमळावर तुझ्याच आहे प्रभु जानकी-राम
वेदाहून ते पवित्र सुंदर, हृदय असू दे सदा निरंतर
आसवांतही वाट भक्तिची त्यातच मेघश्याम

गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | वसंत आजगांवकर |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
आत्माराम | - | आत्मा हाच राम. |