पत्र देउनी एक कबुतर
पत्र देउनी एक कबुतर
पाठविले मी तुला
शिकार समजून तूच तयाला
बाण कसा मारिला
पत्र मिळाले तुटले अंतर
तुझे न् माझे जुळले अंतर
हाय्, परि ते कुठे कबुतर?
तुझ्या प्रीतीचा योग तयाने
येथवरी घडविला
पाठविले मी तुला
शिकार समजून तूच तयाला
बाण कसा मारिला
पत्र मिळाले तुटले अंतर
तुझे न् माझे जुळले अंतर
हाय्, परि ते कुठे कबुतर?
तुझ्या प्रीतीचा योग तयाने
येथवरी घडविला
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | व्ही. डी. अंभईकर |
स्वर | - | व्ही. डी. अंभईकर |
गीत प्रकार | - | भावगीत |