A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुरसुखखनि तूं विमला

सुरसुखखनि तूं विमला सगुणा कविबाला ॥

वदनमणि मज, रमणी, अचुक दावि मार्गाला ॥

देवयानिदेह धरे अमरविभवगुण सारे ।
सकलकला कवितनुजाचरण मला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वराविष्कार- प्रभाकर कारेकर
पं. भीमसेन जोशी
पं. वसंतराव देशपांडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - विद्याहरण
राग - किरवाणी
ताल-दादरा
चाल-वरमुल सखि
गीत प्रकार - नाट्यसंगीत
खनि - खाण.
तनुजा - कन्‍या.
रमणी - सुंदर स्‍त्री / पत्‍नी.
विभव - संपत्ती, ऐश्वर्य.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  प्रभाकर कारेकर
  पं. भीमसेन जोशी
  पं. वसंतराव देशपांडे