A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पत्र तुझे ते येता अवचित

पत्र तुझे ते येता अवचित
लाली गाली खुलते नकळत

साधे सोपे पत्र सुनेरी
नकळे क्षणभर ठेवु कुठे मी
शब्दोशब्दी प्रीत हासरी
लाज मनाला, मी शरणागत

आजवरी जे बोलु न शकले
शब्दांवाचुन तू ओळखिले
गीत लाजरे ओठांवरले
गुणगुणते मी नयनी गिरवित

वेळीअवेळी झोपेमधुनी
जागी होते मी बावरुनी
खुळ्या मनीचा भास जाणुनी
गुज मनीचे हृदयी लपवित
गीत - रमेश अणावकर
संगीत - बाळ चावरे
स्वर- कृष्णा कल्ले
गीत प्रकार - भावगीत
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.