पाऊस पहिला जणू कान्हुला
पाऊस पहिला जणू कान्हुला
बरसून गेला, बरसून गेला
पानावरती देठावरती
मयूर पिसारे फुलती, भिजती
आठवणींना पुसून गेला
बरसून गेला, बरसून गेला
रंग निळुला अंधाराला
गंध लाभला गंधाराला
प्राण दिठीला बिलगून गेला
बरसून गेला, बरसून गेला
तळहाताची मेंदी भिजली
ऋतु लेवुनी राधा सजली
खुणा सावळ्या जडवून गेला
बरसून गेला, बरसून गेला
बरसून गेला, बरसून गेला
पानावरती देठावरती
मयूर पिसारे फुलती, भिजती
आठवणींना पुसून गेला
बरसून गेला, बरसून गेला
रंग निळुला अंधाराला
गंध लाभला गंधाराला
प्राण दिठीला बिलगून गेला
बरसून गेला, बरसून गेला
तळहाताची मेंदी भिजली
ऋतु लेवुनी राधा सजली
खुणा सावळ्या जडवून गेला
बरसून गेला, बरसून गेला
गीत | - | प्रवीण दवणे |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | उषा मंगेशकर |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
दिठी | - | दृष्टी. |
Print option will come back soon