A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पावनखिंडीत पावन झालो

पावनखिंडीत पावन झालो जिंकलीच बाजी
बाजी जातो देवाघरती मरणाला राजी

विशालगडच्या तोफेसाठी कान जिवाचे केले
लाल लाल जरी मान लटकली, बोथट झाले भाले
रक्ताच्या थेंबांतुन उठतिल लाख लाख बाजी

मान आणखी इमान अमुचे शिवबाच्या चरणी
स्वर्ग लाभतो धारातीर्थी, लय लागे मरणी
कसूर शिवबा केली नाही, नसावित राजी

तोफ उडाली, हास्य लाल ते मुखावरी फुलले
सुटले राजे, सुटलो मीही, कलेवरही हसले
भाग्यशाली हे मरण आमुचे, मला मिळे आजी
कलेवर - शरीर.