पायावरी प्रियाच्या सर्वस्व
काया जरी निमाली का प्रीत ओसरेल?
छायेपरी सदा ती मागे तुझ्या फिरेल
पायावरी प्रियाच्या सर्वस्व वाहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी !
प्रीतीसवे हसावे प्रीतीसवे रुसावे
प्रीतीशिवाय काही डोळ्यांस ना दिसावे
त्या धुंद भावनेच्या स्वप्नात राहणारी
दोघांमधील आहे प्रीती युगायुगांची
वेडावल्या जिवाला पर्वा नसे जगाची
ज्योतीवरी पतंग पंखांस दाहणारी
छायेपरी सदा ती मागे तुझ्या फिरेल
पायावरी प्रियाच्या सर्वस्व वाहणारी
मी एक प्रेमवेडी प्रीतीच पाहणारी !
प्रीतीसवे हसावे प्रीतीसवे रुसावे
प्रीतीशिवाय काही डोळ्यांस ना दिसावे
त्या धुंद भावनेच्या स्वप्नात राहणारी
दोघांमधील आहे प्रीती युगायुगांची
वेडावल्या जिवाला पर्वा नसे जगाची
ज्योतीवरी पतंग पंखांस दाहणारी
| गीत | - | शान्ता शेळके |
| संगीत | - | एम्. शफी |
| स्वर | - | लता मंगेशकर |
| चित्रपट | - | श्रीमंत मेहुणा पाहिजे |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| निमणे | - | लय पावणे / मरणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












लता मंगेशकर