A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
फार नको वाकूं

फार नको वाकूं
जरी उंच बांधा;
फार नको झाकूं
तुझा गौर खांदा.

आणि गडे डोळे
तुझे फार फंदी,
साज तुझा आहे
जुईचा सुगंधी.

चित्त मऊ माझें
जशी रानकळी :
धुंद तुझी आहे
नदी पावसाळी.

श्वास तुझेमाझे
जसा रानवारा,
प्रीत तुझीमाझी
जसा सांजतारा.