फेर्यामागे चाले फेरा
          फेर्यामागे चाले फेरा
प्राणी जुंपला संसारा
डोळां मायेची झापड
पाठी दैवाचा आसूड
कानी शब्द नाही गोड
पोटा वाळले चिपाड
कशासाठी व्याप सारा
प्राणी जुंपला संसारा
नाही आरंभ-शेवट
अशी कळाहीन वाट
पुढे-मागुता अंधार
अन् कष्ट देहासी अपार
नाही विसावा-आसरा
प्राणी जुंपला संसारा
लक्ष चौर्यांशी वेळा
फिरे जन्माचा पाचोळा
अखंडित वावटळा
कोण थांबविल गोपाळा
धाव सत्याच्या दातारा
प्राणी जुंपला संसारा
          प्राणी जुंपला संसारा
डोळां मायेची झापड
पाठी दैवाचा आसूड
कानी शब्द नाही गोड
पोटा वाळले चिपाड
कशासाठी व्याप सारा
प्राणी जुंपला संसारा
नाही आरंभ-शेवट
अशी कळाहीन वाट
पुढे-मागुता अंधार
अन् कष्ट देहासी अपार
नाही विसावा-आसरा
प्राणी जुंपला संसारा
लक्ष चौर्यांशी वेळा
फिरे जन्माचा पाचोळा
अखंडित वावटळा
कोण थांबविल गोपाळा
धाव सत्याच्या दातारा
प्राणी जुंपला संसारा
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | 
| संगीत | - | स्नेहल भाटकर | 
| स्वर | - | दशरथ पुजारी, मीना जोशी | 
| चित्रपट | - | तुका झालासे कळस | 
| गीत प्रकार | - | चित्रगीत | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !