A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
फूलपाखरू झालो रे मी

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !
फुलाफुलांचे पंख लावुनी बागेमध्ये आलो !

मऊमऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची
धुक्यात फिरता इकडेतिकडे, दंवबिंदूंनी न्हालो

फुलाफुलावर बसतो मी, खुदकन गाली हसतो मी
डोळे मिटुनी थेंब मधाचे मिटक्या मारीत प्यालो

नकाच लागू पाठी रे, नका धरु मज हाती रे
क्रूरपणा हा बघुनी तुमचा, मनोमनी मी भ्यालो
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - शारंग देव
स्वर- दुर्गा जसराज
गीत प्रकार - बालगीत