A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
फुला फुला रे फुला फुला

फुला फुला रे फुला फुला
मी लपले, तू शोध मला
गंध कुठे तो शोध फुला

दिसत नसे पण सुटला दरवळ
दलात भरल्या लहरी अवखळ
डुले डहाळी जसा झुला

तुझ्या मानसी चाले रुणझुण
तीच सुगंधी माझी गुणगुण
तुझीच प्रीती भुलवी तुला

लपसी कुठे तू वार्‍यापाठी
तुझ्याच हृदयी तुझ्याच ओठी
तुझ्या फुलविते दला दला