A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
फुलपांखरूं

फुलपांखरूं ।
छान किती दिसते । फुलपांखरूं

या वेलींवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

डोळे बारिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येइ न हाता
दूरच तें उडतें । फुलपांखरूं
गीत - ग. ह. पाटील
संगीत - चिनार-महेश
स्वर- स्वप्‍नील बांदोडकर
चित्रपट - टाईमपास
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.