A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
फुलव पिसारा मोरा

फुलव पिसारा मोरा, श्रावण येतो आहे!
उंच स्वराने वारा 'स्वागत' गातो आहे!

तू धरणीचा मानसभाव
सहजनृत्य हा तुझा स्वभाव
आजवरीच्या उच्छवासांचा सौरभ होतो आहे!

थेंब कशाचे? जलवर्षाव
तृप्तीमाजी बुडेल गाव
वसुंधरेचा प्रियकर वेगे दौडत येतो आहे!

लवते वेली, हलते झाड
विजयाआधी धुंद कवाड
संघनृत्यी या उडते माती, गुलाल होतो आहे!
कवाड - दरवाजाची फळी, दरवाजा.
पवाड - महती / कीर्ती.
लवणे - वाकणे.
वसुंधरा (वसुधा) - पृथ्वी.