फुटला अंकुर वंशाला आज
फुटला अंकुर वंशाला आज
रांगणार घरी बाळराजं
किती नवस-सायास केलं
वावर जत्रंला जोडीनं गेलं
गंडंदोरं ताईत किती झालं
आता कुळाला चढणार साज
आता बारशाला उडवू या थाट
बारा गावाला आवातनं मोठं
मिरवू पंगतीत शेमल्याची ऐट
दारू शोभेची उडवू दणकेबाज
नगं मिरवूस लेका तू तोरा
अक्षि मुलगाच व्हणार होरा
आबा-नानाचा छापील चेहरा
तुझीमाझी लागली आता पैज
समदी शिरिष्टी व्हईल हलकी
जड पारू वयनी तिला पालखी
गोड बोलून ठिवू तिला बोलकी
पुरव ढवाळं नवनवं रोज
रांगणार घरी बाळराजं
किती नवस-सायास केलं
वावर जत्रंला जोडीनं गेलं
गंडंदोरं ताईत किती झालं
आता कुळाला चढणार साज
आता बारशाला उडवू या थाट
बारा गावाला आवातनं मोठं
मिरवू पंगतीत शेमल्याची ऐट
दारू शोभेची उडवू दणकेबाज
नगं मिरवूस लेका तू तोरा
अक्षि मुलगाच व्हणार होरा
आबा-नानाचा छापील चेहरा
तुझीमाझी लागली आता पैज
समदी शिरिष्टी व्हईल हलकी
जड पारू वयनी तिला पालखी
गोड बोलून ठिवू तिला बोलकी
पुरव ढवाळं नवनवं रोज
गीत | - | शाहीर साबळे |
संगीत | - | शाहीर साबळे |
स्वर | - | शाहीर साबळे |
गीत प्रकार | - | लोकगीत |
सायास | - | विषेष आयास (कष्ट), श्रम. |