A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रणाम हा तुम्हां जवान हो

प्रणाम हा, प्रणाम हा तुम्हां जवान हो

हाक ऐकता उठून धावला
ना क्षणैक थांबला-विसावला
प्राण मानिला तुम्ही तृणासमान हो

क्रूर आग पेटली चहूकडे
वज्रसे तुम्ही तशातही खडे
चालले अजिंक्य हे पुढे तुफान हो

शत्रुचा विनाश पार संगरी
हेच ध्येय हाच मंत्र अंतरी
पिंजल्या उरांत रोविले निशाण हो

रक्त वाहते उरांत रोधुनी
ठेविलीत खिंड खिंड रोखुनी
चेतवील सर्व देश हे इमान हो

राष्ट्ररक्षणी तुम्ही अनिद्र हो
तुम्हीच वीरभद्र आणि रुद्र हो
या हिमालयाहुनी तुम्ही महान हो
गीत - मंगेश पाडगांवकर
संगीत -
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
चेतवणे - उद्दीपित करणे, पेटवणे.
तृण - गवत.
पिंजणे - फाडणे, विस्कटून मोकळा करणे.
भद्र - सुशील / नम्र.
संगर - युद्ध.

 

  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.