प्रार्थना देवा तुला ही
प्रार्थना देवा तुला ही, तू सदा जवळी रहा
मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा
दुःख जेव्हा दाटूनीया भार होतो अंतरी
मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरूडापरी
संकटांशी झुंजण्याला हात दे मजला दहा
स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा
संयमाचा पथही माझ्या लोचनांना पारखा
सारथी होऊन आता आवरी अपघात हा
आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी
तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी
देह हा कर्मांत सरुनी, सफल होवो जन्म हा
मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा
दुःख जेव्हा दाटूनीया भार होतो अंतरी
मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरूडापरी
संकटांशी झुंजण्याला हात दे मजला दहा
स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा
संयमाचा पथही माझ्या लोचनांना पारखा
सारथी होऊन आता आवरी अपघात हा
आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी
तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी
देह हा कर्मांत सरुनी, सफल होवो जन्म हा
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | उषा अत्रे-वाघ, सुधीर फडके |
गीत प्रकार | - | प्रार्थना |