A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रथम करा हा विचार

प्रथम करा हा विचार पुरता ।
आवरोनि ममता ॥

धनाढ्य आपण मान्य कुळींचे ।
हीन कुळीची मी मज वरितां ॥

करितिल निंदा हंसतील सारे ।
जाति धर्म कुलहि अवगणितां ॥

लग्‍नगांठ ही पडे एकदां ।
न ये पुन्हा कधिं ती सोडिवतां ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- मधुवंती दांडेकर
नाटक - संगीत संशयकल्लोळ
चाल-हमसे नजरिया
गीत प्रकार - नाट्यसंगीत