A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रीत रंगली ग

प्रीत रंगली ग कशी राजहंसी

अग बाई ग लाजली हंसी,
बोले ना ती तुझ्याशी!

तुझिया कपोली प्रीत रंगली ग
लाजून हसली, बघ इकडे ग
धरिसी कशाला पदर उराशी
तुझी रे हंसी, फसली कैसी, पडली पाशी,
धीट किती हा रमण विलासी,
बोले ना ती तुझ्याशी!

रुसली राणी, डोळां पाणी, हास्य आननी
नजर तुझी घे, थरथरणारी, वरती जराशी
गोड बोलुनी, प्रेम दावुनी, हृदय जिंकुनी,
जाल सोडुनी, कुठे दूर देशी,
बोले ना ती तुझ्याशी!
आनन - मुख, तोंड.
कपोल - गाल.

 

  मन्‍ना डे, लता मंगेशकर