प्रीतसागरी तुझ्या स्मृतीचे
प्रीतसागरी तुझ्या स्मृतीचे
गर्जत आले वारे, वादळ
फिरू लागले जग वाटोळे
सुन्न मनाने मिटले डोळे
रात निराशा ओकित काजळ
भग्न मनोरथ फुटला मचवा
हात कुणी द्या मला वाचवा
मिळे सागरी अश्रू ओघळ
तुफान झुंजत दीपमनोरा
अढळ उभारी किरणपिसारा
पिंजून लाटा झरे प्रभावळ
गर्जत आले वारे, वादळ
फिरू लागले जग वाटोळे
सुन्न मनाने मिटले डोळे
रात निराशा ओकित काजळ
भग्न मनोरथ फुटला मचवा
हात कुणी द्या मला वाचवा
मिळे सागरी अश्रू ओघळ
तुफान झुंजत दीपमनोरा
अढळ उभारी किरणपिसारा
पिंजून लाटा झरे प्रभावळ
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |
प्रभा | - | तेज / प्रकाश. |
पिंजणे | - | फाडणे, विस्कटून मोकळा करणे. |
मचवा | - | होडी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.