रक्ष रक्ष ईश्वरा भारता
रक्ष रक्ष ईश्वरा भारता प्राचिना जनपदा
भोगियली बहु जये एकदा वैभव सुख-संपदा
सागरद्विपाहूनि सिंधु तो काश्मिरापासुनी
कृष्णकुमारीकडे शांतीचे राज्य देई पसरुनी
प्रेमभाव धरुनिया पुत्र हे ऐक्य करुन झडकरी
नित्य स्वधर्मा जाणून करू दे कर्तव्ये ही खरी
शाश्वत सत्य ज्ञान दिवाकर उगवो हृदयांतरी
धर्मतेज देखून चकित हो देववृंद अंबरी
गाढतमी बुडतसे राष्ट्र हे उद्बोधन या करी
कृपाकटाक्षे पुन्हा चढू दे वैभव शिखरावरी
रोमरंध्री चैतन्य खेळवी राष्ट्राच्या ईश्वरा
सात समुद्रावरी फडकू दे यशोध्वजा सुंदरा
भोगियली बहु जये एकदा वैभव सुख-संपदा
सागरद्विपाहूनि सिंधु तो काश्मिरापासुनी
कृष्णकुमारीकडे शांतीचे राज्य देई पसरुनी
प्रेमभाव धरुनिया पुत्र हे ऐक्य करुन झडकरी
नित्य स्वधर्मा जाणून करू दे कर्तव्ये ही खरी
शाश्वत सत्य ज्ञान दिवाकर उगवो हृदयांतरी
धर्मतेज देखून चकित हो देववृंद अंबरी
गाढतमी बुडतसे राष्ट्र हे उद्बोधन या करी
कृपाकटाक्षे पुन्हा चढू दे वैभव शिखरावरी
रोमरंध्री चैतन्य खेळवी राष्ट्राच्या ईश्वरा
सात समुद्रावरी फडकू दे यशोध्वजा सुंदरा
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • या रचनेच्या शेवटच्या काही ओळी, राजा बढे यांच्या हस्तलिखितात अस्पष्ट आहेत. आपल्याकडे यांविषयी काही माहिती असल्यास कृपया आम्हाला कळवा. • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |