प्रीत तशी आपुली
जल धरतीचे होते मीलन
तुटण्यासाठी इथे चिरंतन
प्रीत तशी आपुली
एकजीव रंगुनी
तशीच आज भंगून होत प्रिया वेगळी
नेत्र नेत्र मीलनी
चंद्रकला हासली
दीप राग संपुनी रात्र एक काजळी
अधरी रंगपंचमी
अमृतात नाहली
ओढ तुटून संगमी ओघवती आटली
तुझ्या करी उघडली
रत्नमूठ झाकली
तुझ्याविनाच या स्थळी शून्य करी शिंपली
तुटण्यासाठी इथे चिरंतन
प्रीत तशी आपुली
एकजीव रंगुनी
तशीच आज भंगून होत प्रिया वेगळी
नेत्र नेत्र मीलनी
चंद्रकला हासली
दीप राग संपुनी रात्र एक काजळी
अधरी रंगपंचमी
अमृतात नाहली
ओढ तुटून संगमी ओघवती आटली
तुझ्या करी उघडली
रत्नमूठ झाकली
तुझ्याविनाच या स्थळी शून्य करी शिंपली
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | तारका |
गीत प्रकार | - | चित्रगीत |