A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रीत तुझीमाझी कुणाला सांगु

प्रीत तुझीमाझी, कुणाला सांगु नको साजणी
पुन्हा पुन्हा हिणवुनी, तुला ग हसतिल ना मैत्रिणी

सवे प्रीतीची ज्योती उजळू
सवेच प्रीतीलहरी उधळू
प्रसन्‍नतेने निवांत खेळू प्रीतीच्या अंगणी

चंदेरी रात्री जाउनिया
काठावरुनी पाहू दरिया
देइल सोबत येउन उदया शुक्राची चांदणी

अपुल्या प्रीतिची ग द्वाही
फिरवू नको इतुक्यात कुठेही
उघडपणे मम गुणगौरवही करू नको साजणी
गीत - बाबुराव गोखले
संगीत - गजानन वाटवे
स्वर- गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
द्वाही - दवंडी.