प्रीतीचा नव वसंत फुलला
प्रीतीचा नव वसंत फुलला, हृदयांतरी खुलला
नव्या नवतीचा नवलाईचा, बाग दिलाचा दरवळला
पुरे प्रीतिचा छंद चाळा, जगावेगळा हा असला
नाजुक साजुक गोजिरवाणी, किती ग भोळी तू फुलराणी
प्रणय साज शृंगार साजणी, अंगारच जणू रसरसला
प्रियकर मधुकर धावुन येईल, रसिकराज मधुरुंजी घालील
मंजुळ गुंजनी सदा रंगविल ह्या हसर्या फुलराणीला
कुटिल भृंग रंगेल वृत्तीचा, लुटिल नवरसरंग नवतीचा
वंचिल चंचल निष्ठुर साचा, लोटिल विरहानली कलिकेला
प्रेमळ कमळण चतुर धूर्तही, भृंगसख्याला कोंडिल हृदयी
सहजच तो मग अंकित होई, जिंकित प्रेम जगाला

गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | आशा भोसले, उषा मंगेशकर |
चित्रपट | - | या मालक |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अंकित | - | गुलाम. |
कमळिणी | - | कमलिनी. कमळण. कमळाची वेल. |
नवती | - | तरुणी / तारुण्य. |
नवती | - | नवी पालवी. |
मधुकर | - | भ्रमर, भुंगा. |
Print option will come back soon