प्रीतीचा पारिजात फुलला
प्रीतीचा पारिजात फुलला
सुगंध त्याचा तुझ्या नि माझ्या हृदयी दरवळला
पहिली ओळख, स्पर्शही पहिला
हर्ष तयाचा असे आगळा
हृदयवीणेवर आज कुणीतरी अनुरागची छेडिला
हळूच येउनी स्वप्नमंदिरी
वाजविता तू प्रीत-बासरी
स्वरास्वरांचा कैफ माझिया नयनांवर दाटला
नयनकडांवर लाज दाटता
अवघडले तुजकडे पाहता
कधी चुकुनी लोचन जुळता मन्मथ झंकारला
सुगंध त्याचा तुझ्या नि माझ्या हृदयी दरवळला
पहिली ओळख, स्पर्शही पहिला
हर्ष तयाचा असे आगळा
हृदयवीणेवर आज कुणीतरी अनुरागची छेडिला
हळूच येउनी स्वप्नमंदिरी
वाजविता तू प्रीत-बासरी
स्वरास्वरांचा कैफ माझिया नयनांवर दाटला
नयनकडांवर लाज दाटता
अवघडले तुजकडे पाहता
कधी चुकुनी लोचन जुळता मन्मथ झंकारला
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | अनिल मोहिले |
स्वर | - | कुंदा बोकिल |
गीत प्रकार | - | भावगीत |
अनुराग | - | प्रेम, निष्ठा. |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
Print option will come back soon