प्रेम करुन मी चुकले
मलाही मुकले तुलाही मुकले
प्रेम करुन मी चुकले
मीच लाविल्या वेलीवरचे
मृदुलदलांचे मधुगंधाचे
फुलता फुलता मम प्रणयाचे फूल अचानक सुकले
धार प्रवाही संगमी तुटली
उगमापासुन सरिता आटली
पाण्याविण ह्या डोहाभवती मृगजळ घेरून बसले
दोन पाखरे मिळुनी रमता
एकावरती घाव बसता
सुखात दुसरे इतुके कळता व्याकुळ लोचन हसले
प्रेम करुन मी चुकले
मीच लाविल्या वेलीवरचे
मृदुलदलांचे मधुगंधाचे
फुलता फुलता मम प्रणयाचे फूल अचानक सुकले
धार प्रवाही संगमी तुटली
उगमापासुन सरिता आटली
पाण्याविण ह्या डोहाभवती मृगजळ घेरून बसले
दोन पाखरे मिळुनी रमता
एकावरती घाव बसता
सुखात दुसरे इतुके कळता व्याकुळ लोचन हसले
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभू |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | गृहदेवता |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
मृगजळ | - | आभास. |
सरिता | - | नदी. |
Print option will come back soon