A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रेमसखा उद्धरि जिवाला

जननि चलाचला, प्रीति जीवकला;
लोल लोकां सूत्र असे अचला प्रीतिलीला.

प्रेमसखा उद्धरि जिवाला;
हा जन्मतांच ब्रह्मा साक्षात आला;
देवधर्ममहिमा धरि खरा प्रेमा;
तारण्या जगाला देव प्रीत झाला ॥

ईशाचे नामा-स्वरूपा-पहाया, मिळाया
विशाल मार्ग सोपा प्रेम मला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - हिराबाई बडोदेकर, गंधर्व नाटक मंडळी
स्वर- बालगंधर्व
नाटक - विद्याहरण
राग - जिल्हा, धानी
ताल-दादरा
चाल-जाको सखि
गीत प्रकार - नाट्यसंगीत
लोल - चंचल / आसक्त.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.