प्रेम तुझ्यावर करिते मी रे
प्रेम तुझ्यावर करिते मी रे
सांगितल्याविण ओळख तू रे
चंद्र झळकता तुझिया नयनी
या डोळ्यातील प्रीत-रोहिणी
ओढुन किंचित निळी ओढणी
हासत खुदुखुदु लाजत का रे?
पल्लवतो बघ तनुलतिकेवर
स्पर्श सुखाचा तो गुलमोहर
चैत्रप्रीतीच्या आम्रतरूवर
बोलत कुहुकुहु कोकिळ का रे?
तुझ्या दिशेला वळता मोहुन
सूर्यफुलापरी फुलते यौवन
भ्रमर मनाचा हृदयी रंगुन
गुंजत हितगुज तुझेच का रे?
सांगितल्याविण ओळख तू रे
चंद्र झळकता तुझिया नयनी
या डोळ्यातील प्रीत-रोहिणी
ओढुन किंचित निळी ओढणी
हासत खुदुखुदु लाजत का रे?
पल्लवतो बघ तनुलतिकेवर
स्पर्श सुखाचा तो गुलमोहर
चैत्रप्रीतीच्या आम्रतरूवर
बोलत कुहुकुहु कोकिळ का रे?
तुझ्या दिशेला वळता मोहुन
सूर्यफुलापरी फुलते यौवन
भ्रमर मनाचा हृदयी रंगुन
गुंजत हितगुज तुझेच का रे?
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | सिंध भैरवी |
गीत प्रकार | - | भावगीत |
पल्लवित | - | विस्तृत. |
लता (लतिका) | - | वेली. |