प्रेमा काय देऊ तुला
प्रेमा काय देऊ तुला?
भाग्य दिले तू मला
प्रीतीच्या या पांखराचे रत्नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून मोहरलेला
या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढ ती तुला हवी का
रूपमोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला
मोहक सुंदर जे जे दिसते तूच तयांचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरिता अधरीच्या या अमृताला

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | शिकलेली बायको |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कांचन | - | सोने. |