प्रेमवेडी राधा साद घाली
प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा
लपसी कोठे गोपाला, गोविंदा
तुझे निळेपण आभाळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
प्रसन्न सुंदर वा कमळाचे
त्याची मज हो बाधा
तुला शोधिते मी दिनराती
तुजसी बोलते हरी एकान्ती
फिरते मानस तुझ्या सभोवती
छंद नसे हा साधा
लपसी कोठे गोपाला, गोविंदा
तुझे निळेपण आभाळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
प्रसन्न सुंदर वा कमळाचे
त्याची मज हो बाधा
तुला शोधिते मी दिनराती
तुजसी बोलते हरी एकान्ती
फिरते मानस तुझ्या सभोवती
छंद नसे हा साधा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | आराम हराम आहे |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
कालिंदी | - | यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते. |
मानस | - | मन / चित्त / मानस सरोवर. |