A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रिये पहा रात्रींचा समय सरुनि

प्रिये पहा रात्रींचा समय सरुनि येत उषःकाल हा ॥

थंडगार वात सुटत । दीपतेज मंद होत ।
दिग्वदनें स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥

पक्षि मधुर शब्द करिति । गुंजारव मधुप वरिति ।
विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥

सुखदुःखा विसरुनियां । गेलें जें विश्व लया ।
स्थिति निज ती सेवाया । उठलें कीं तेंची अहा ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- छोटा गंधर्व
प्रभाकर कारेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
राग - देसकार, भूप
ताल-दादरा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
मधुप - भुंगा, भ्रमर.
रुह - वाढवणारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  छोटा गंधर्व
  प्रभाकर कारेकर