A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पुजा हो दत्तगुरु दिनरात

पुजा हो दत्तगुरु दिनरात
सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो दत्तगुरु पूजनात

ब्रह्माविष्णूसवे महेश्वर
त्रैमूर्तीचे रूप मनोहर
अनसूयेच्या सदनी भूवर रमले आनंदात

श्यामल नयनी प्रेमळ दृष्टी
सदा कृपेची करिती वृष्टी
भक्तजनांच्या पाठीवरती फिरवी कोमल हात

प्रसन्‍न होउनी दत्तदिगंबर
उद्धरती हे सर्व चराचर
अत्रिनंदन करुणासागर नित्य असो स्मरणांत
अत्रि - सप्तर्षींपैकी एक. दत्तात्रेय पिता. अनसूया पती. यांचा जन्‍म ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून झाला होता.
अनसूया - अत्रि ऋषींची पत्‍नी. दत्त व दुर्वास ऋषी यांची माता. ब्रम्हा, विष्णु व महेश यांनी हिच्या पातिव्रत्याची कसोटी पाहण्याचा प्रयत्‍न केला असता हिने आपल्या तपोबलाने त्यांना मुले बनविले. हे तिघे मिळून दत्तात्रय अवतार झाला.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.