पुंडलिका भेटी आले
पुंडलिका भेटी आले जगजेठी
उभे विटेवरी चंद्रभागेतीरी
मुक्तीचे माहेर, भक्तीचे सासर
संतांची पंढरी चंद्रभागेतीरी
वैराग्याचा पाया घाली ज्ञानराया
चौकोनी चौफेरी चंद्रभागेतीरी
नामयाची वीट, जनी सांधी नीट
चोख्याची पायरी चंद्रभागेतीरी
उभे विटेवरी चंद्रभागेतीरी
मुक्तीचे माहेर, भक्तीचे सासर
संतांची पंढरी चंद्रभागेतीरी
वैराग्याचा पाया घाली ज्ञानराया
चौकोनी चौफेरी चंद्रभागेतीरी
नामयाची वीट, जनी सांधी नीट
चोख्याची पायरी चंद्रभागेतीरी
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | स्नेहल भाटकर |
चित्रपट | - | नांदायला जाते |
गीत प्रकार | - | चित्रगीत, विठ्ठल विठ्ठल |
जगजेठी | - | जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर. |