पुंडलिका भेटी परब्रह्म आले
कलियुगामाजी अपरूप झाले
भक्ताच्या दर्शना भगवंत आले
पुंडलिका भेटी परब्रह्म आले
पुंडलिकासाठी धाव घेई श्रीहरी
कर कटिवरी, उभा विटेवरी
नित्य पंढरीत नाम घोष चाले
धन्य पुंडलिक, धन्य त्याची सेवा
भूलोकी आणिला कैवल्याचा ठेवा
पिढ्यापिढ्यांवरी उपकार केले
विठ्ठलचरणी नाही भेदभाव
नाही जातपात, नाही रंकराव
समतेचा ओघ पुढे पुढे चाले
भक्ताच्या दर्शना भगवंत आले
पुंडलिका भेटी परब्रह्म आले
पुंडलिकासाठी धाव घेई श्रीहरी
कर कटिवरी, उभा विटेवरी
नित्य पंढरीत नाम घोष चाले
धन्य पुंडलिक, धन्य त्याची सेवा
भूलोकी आणिला कैवल्याचा ठेवा
पिढ्यापिढ्यांवरी उपकार केले
विठ्ठलचरणी नाही भेदभाव
नाही जातपात, नाही रंकराव
समतेचा ओघ पुढे पुढे चाले
गीत | - | अण्णासाहेब देऊळगावकर |
संगीत | - | भास्कर चंदावरकर |
स्वर | - | रवींद्र साठे |
चित्रपट | - | भक्त पुंडलिक |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, चित्रगीत |
अपरूप | - | दुर्मिळ / अद्भूत. |
कटि | - | कंबर. |
कैवल्य | - | मोक्ष, मुक्ती. |
रंक | - | भिकारी / गरीब. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.