पूरबी सूर्य उदैला जी
पूरबी सूर्य उदैला जी
उडती पंछी आकाशी
घागरी पाणोठ्यापाशी
दूर नदीवर वेणू रुणझुण
घुंगरमाळा जी
प्राणांतून प्रार्थना
कपाळी कुमकुम लावून जी
जात्यावर घरघर
देवालय मृदुंग झालं जी
उडती पंछी आकाशी
घागरी पाणोठ्यापाशी
दूर नदीवर वेणू रुणझुण
घुंगरमाळा जी
प्राणांतून प्रार्थना
कपाळी कुमकुम लावून जी
जात्यावर घरघर
देवालय मृदुंग झालं जी
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | एक होता विदूषक |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
वेणु | - | बासरी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.