A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पुस्तकांतली खूण कराया

पुस्तकांतली खूण कराया
दिलें एकदा पीस पांढरें;
पिसाहुनी सुकुमार कांहिसें
देतां घेतां त्यांत थरारे.

मेजावरचें वजन छानसें
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही,
मिना तयाचा त्यावर जडला.

असेंच कांही द्यावें.. घ्यावें..
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यांत मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.
मेज - टेबल.
मिना - थर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  पद्मजा फेणाणी-जोगळेकर