रे तुजविना मन रमेना
रे, तुजविना मन रमेना !
जरी पुनववेल फुलली भोवती तरीही जिवा गमेना
सुखशय्याही होय निखारा
फुलवेलींची झाली कारा
शिणवी काया चंदनवारा, रात तुझ्यावाचून जाइना
चंचल ऊर्मी हृदयी नवथर
क्षणांत आतुर क्षणांत कातर
कधी अनावर उठते काहुर, प्राण खुळा प्राणांत राहिना
येशिल तू पण येशिल तू रे
सर्वांगांतुन तुझे इशारे
तुझ्या स्वागता अधीर शहारे, प्राणसख्या एकदा येइना

गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | बकुळ पंडित |
गीत प्रकार | - | भावगीत, मना तुझे मनोगत |
टीप - • दूरदर्शन कार्यक्रम 'शब्दांच्या पलीकडले'साठी. |
कारा | - | कारावास. |
नवथर | - | नवीन. |