रडतच आलो येताना
रडतच आलो येताना पण हासत जावे जाताना
अंगावर आसूड विजेचे
झेलून घेती घन वर्षेचे
सार्थक झाले कोसळण्याचे तृषित धरित्री न्हाताना
हासत हासत ज्योती जळली
कोळोखाची रात्र उजळली
पहाट झाली तेव्हा नव्हती तेजोमय जग होताना
बीज आतुनी फुटुन गेले
वेदनेत या फूल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे मरण झेलुनी घेताना
कुणी दु:खाचा घोट घेतला
खोल व्यथेने प्राण पेटला
त्या दु:खाचे झाले गाणे जीव उधळुनी गाताना
अंगावर आसूड विजेचे
झेलून घेती घन वर्षेचे
सार्थक झाले कोसळण्याचे तृषित धरित्री न्हाताना
हासत हासत ज्योती जळली
कोळोखाची रात्र उजळली
पहाट झाली तेव्हा नव्हती तेजोमय जग होताना
बीज आतुनी फुटुन गेले
वेदनेत या फूल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे मरण झेलुनी घेताना
कुणी दु:खाचा घोट घेतला
खोल व्यथेने प्राण पेटला
त्या दु:खाचे झाले गाणे जीव उधळुनी गाताना
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | अरुण दाते |
गीत प्रकार | - | भावगीत |
तृषा | - | तहान. |