राधे तुझा सैल अंबाडा
कसा ग गडे झाला? कुणी ग बाई केला?
राधे तुझा सैल अंबाडा
पृथ्वीच्या पेल्यात गाळिली, रजनीच्या बागेतिल द्राक्षें
भुलवुनि तुजला वनांत नेली, रसरसलेली रात्र रंगली
वाजविता बासरी, कचपाशांचा नाग उलगडी फडा
पहिल्या चंचल भेटीमधली, बाल्याची कबुतरें पळाली
वेणी तिपेडी कुरळी मृदुला, सुटली घालित गंध-सडा
भ्रमर रंगी हा श्याम सांपडे, नीलकमल कचपाशि तव गडे
अरुणोदय होतांच उलगडे, पाकळि पाकळि होइ मोकळी
या कोड्याचा झाला उलगडा

गीत | - | मनमोहन नातू |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
कच | - | केस. |
पाश | - | जाळे. |
फडा | - | सर्पाची फणा. |